शपथ समता भूमीवरून… निर्धार भाजपाचा… पुकार समतेचा, पुण्याच्या प्रगतीचा

👁️ 459 Views

पुणे :क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समताभूमीवरून भारतीय जनता पार्टी–युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला. ही केवळ प्रचाराची सुरुवात नसून, पुण्याच्या समताधिष्ठित आणि गतिमान भविष्यासाठी घेतलेली सामूहिक शपथच होती.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात, पुण्याच्या शाश्वत विकासासाठी, सर्वसमावेशक प्रगतीसाठी आणि नागरिककेंद्रित सुशासनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समतेच्या विचारांवर उभा राहून विकासाचा वेग वाढवण्याचा संकल्प सर्व उमेदवारांनी घेतला. मा. चव्हाण म्हणाले, “सावित्रीमाईंच्या आदर्शांना अनुसरून आम्ही सामाजिक समता, शिक्षण आणि न्यायाच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. पुणे शहराला अधिक समृद्ध आणि समान बनवण्यासाठी हा निर्धार आहे.”

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, आमदार हेमंतभाऊ रासने, ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यासह भाजप–युतीचे पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रम प्रेरणादायी ठरला, तर प्रचार मोहिमेला उत्साही सुरुवात झाली.

सामाजिक समतेसाठी वेचलेल्या सावित्रीमाईंच्या आयुष्याला आदरांजली वाहत, उमेदवारांनी मतदारांना समतेच्या ध्येयासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.या शपथेनेच पुण्याच्या विकासाला नवसंजन मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.