विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी उद्योग-सामाजिक संस्थांच्या सहकार्याला चालना: चंद्रकांतदादा पाटील
मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत DELL टेक्नॉलॉजी आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या ‘उडान (UdAAN)’…
