Headlines

Admin

दांडेकर पुलाजवळील पीएमपीएल (PMPML)च्या मोक्याच्या जागेची जुनी एनओसी (NOC) रद्द करा

बस पार्किंगसाठी जागेची गरज; ‘आपले पुणे – आपला परिसर’च्या पदाधिकाऱ्यांची CMD महेश आहवाड यांच्याकडे मागणी पुणे : दांडेकर पुलाजवळ PMPMLसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागेचा ताबा महामंडळाने स्वतःकडे घ्यावा, तसेच या जागेच्या विकासासाठी पूर्वी देण्यात आलेली ना-हरकत प्रमाणपत्राची (NOC) परवानगी रद्द करावी, अशी मागणी ‘आपले पुणे – आपला परिसर’च्या पदाधिकाऱ्यांनी PMPMLचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश…

Read Full News

शिक्षकांचा वाढता पाठिंबा; कौस्तुभ गावडे यांचा विजयाचा विश्वास

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण भागांतून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने करण्यात येत आहे. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार गावडे…

Read Full News

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी उद्योग-सामाजिक संस्थांच्या सहकार्याला चालना: चंद्रकांतदादा पाटील 

मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत DELL टेक्नॉलॉजी आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या ‘उडान (UdAAN)’…

Read Full News

बावधनमध्ये खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दुरुस्तीची कामे

पुणे : परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवास करता यावा, यासाठी विविध ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्याची कामे करण्यात आली आहेत. बावधन बुद्रुक, ओंकार गार्डन चौक, उत्तमनगर, भुंडे वस्ती, बकाजी कॉर्नर यासह परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना…

Read Full News

४० वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर उल्का मोकासदार यांचे राजकीय पुनर्वसन होणार?

पुणे : राष्ट्र सेविका समिती दलाच्या सेविका म्हणून गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उल्का मोकासदार यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. कोथरूडच्या रहिवासी असलेल्या आणि अभ्यासू,उत्तम वक्त्या,वस्ती पातळी पासून उद्योजक,शैक्षणिक संस्था अशा अनेक संस्था,व्यक्ती यांच्या संपर्कात असलेल्या मोकासदार या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिल्या असून, आगामी काळात पक्ष संघटनेकडून त्यांना…

Read Full News

PMRDAच्या नवनियुक्त लिपिक-टंकलेखकांना पायाभूत प्रशिक्षण

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) नव्याने नियुक्त झालेल्या लिपिक-टंकलेखकांसाठी यशदाच्या राज्य नागरी विकास संस्थेच्या वतीने पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १७ ते २८ ऑगस्टदरम्यान बालेवाडी येथील सदानंद रेजिन्सी येथे हा १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यंकटेश कल्याणकर यांनी सहयोगी सत्र संचालक (Associate…

Read Full News

तिबेट प्रश्नावर जनजागृतीसाठी भारत-तिबेट सहयोग मंचाची बैठक ; जनजागृती आणि संघटनात्मक कार्याबाबत चर्चा

पुणे : भारत-तिबेट सहयोग मंच, पश्चिम महाराष्ट्र प्रांताची व्यापक बैठक मोतीबाग संघ कार्यालय, पुणे येथे नुकतीच पार पडली. तिबेट मुक्ती अभियान, कैलास-मानसरोवर मुक्ती संकल्प अभियान तसेच तिबेटी बांधवांच्या हक्कांबाबत जनजागृती आणि संघटनात्मक कार्याच्या विस्तारासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष सुनील देवभानकर यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. आगामी…

Read Full News

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पुणे : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आयोजित ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असून अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत…

Read Full News

मोहोळला सोलापूरपासून तोडू नका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजन घाडगे, रामलिंग महामुनी यांची मागणी

मोहोळ : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला हरकत घेत, मोहोळ तालुका पूर्वीप्रमाणेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजन घाडगे आणि रामलिंग महामुनी यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारयांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात मोहोळ तालुक्याची भौगोलिक रचना, प्रशासकीय सोयी, नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजासाठी सोलापूरवरील…

Read Full News

उंद्रीत महिला उद्योजकांचा उत्साह; ‘राईज अँड शाइन’कडून फ्ली मार्केटला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून महिलांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि विस्तार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. संस्थापक सौ. सुप्रिया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. टीममधील मनीषा भुजबळ आणि अनीता मॅगिलाम्पू यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विविध आकर्षक स्टॉल्समधून…

Read Full News