पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) नव्याने नियुक्त झालेल्या लिपिक-टंकलेखकांसाठी यशदाच्या राज्य नागरी विकास संस्थेच्या वतीने पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १७ ते २८ ऑगस्टदरम्यान बालेवाडी येथील सदानंद रेजिन्सी येथे हा १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यंकटेश कल्याणकर यांनी सहयोगी सत्र संचालक (Associate Course Director) म्हणून जबाबदारी सांभाळली. यशदातील सहयोगी प्राध्यापक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी मार्गदर्शक म्हणून, तर सहायक प्राध्यापक स्वाती कामत यांनी सत्रसंचालक म्हणून काम पाहिले. सत्र सहायक म्हणून आनंद भागवत यांनी योगदान दिले. प्रशिक्षणाच्या संपूर्ण नियोजनात पूजा पानसरे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
प्रशिक्षणात PMRDAमधील ४६ नवनियुक्त लिपिक-टंकलेखक सहभागी झाले होते. प्रशिक्षणाचे नियोजन, विविध विषयांवरील व्याख्यात्यांचा समन्वय, शिवनेरी येथील क्षेत्रभेट तसेच यशदा परिसर भेट आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
PMRDAचे आयुक्त अभिजित चौधरी (भाप्रसे) यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज, क्षेत्रीय अनुभव आणि प्रशिक्षण व्यवस्थापनाचा समृद्ध अनुभव मिळाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी आनंद भागवत, अँड. विपूल मोरे, राजीव नंदकर, यशदाचे उपमहासंचालक सचिन कलंत्रे, स्वाती कामत, पूजा पानसरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
