उंद्रीत महिला उद्योजकांचा उत्साह; ‘राईज अँड शाइन’कडून फ्ली मार्केटला उत्स्फूर्त प्रतिसाद

👁️ 149 Views

पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून महिलांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि विस्तार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.

संस्थापक सौ. सुप्रिया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. टीममधील मनीषा भुजबळ आणि अनीता मॅगिलाम्पू यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विविध आकर्षक स्टॉल्समधून हस्तकला, फॅशन, खाद्यपदार्थ आदी क्षेत्रातील सर्जनशीलता आणि उद्योजकतेचा उत्कृष्ट आविष्कार पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती श्वेता घुले यांनी सर्व सहभागी महिलांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.

प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या फ्ली मार्केटने महिला उद्योजकांच्या आत्मविश्वासात भर घातली असून, त्यांच्या व्यवसायाला नवी ओळख मिळवून दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे आयोजकांनी आभार मानले.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणि त्यांच्या स्वप्नांना व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.