शिवसेनेच्या प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ उद्या; उद्योगमंत्री उदय सामंतांसह नेत्यांची उपस्थिती
पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिवसेनेने आपल्या प्रचार अभियानाला भव्य सुरुवात करण्याची तयारी केली आहे. उद्या (३ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची भव्य आरती करून शुभारंभ होईल. या धार्मिक सोहळ्यानंतर हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यात पक्षाच्या सर्व…
