Headlines

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना.पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे  कोथरुडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत…

Read Full News

जय शंकर टेंडरवर प्रश्नचिन्ह?; कर्मचाऱ्यांना कमी वेतन व उशिरा देयकांचा आरोप

पुणे: पुणे महानगरपालिका (पीएमसी) अंतर्गत देण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या कंत्राटात ‘जय शंकर टेंडर’ कंपनीबाबत अनियमिततेच्या चर्चांना उधाण आले आहे. संबंधित कंत्राटात उच्चपदस्थ अधिकारी किंवा प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची चर्चा रंगू लागली असून, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनातील तफावत आणि देयकांच्या विलंबामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारच्या प्रचलित नियमांनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुमारे ३० हजार…

Read Full News

कोथरूडमध्ये अवैध बांधकामांचा विळखा; युवासेना नेते रोहित मारणे ॲक्शन मोडवर

पुणे : पुण्याच्या कोथरूड परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट होत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत असून, याविरोधात युवासेना रोहित मारणे आक्रमक भूमिकेत उतरले आहेत. नामांकित बिल्डरांनी बनावट कागदपत्रे व नियमांना बगल देत बेकायदा इमारती उभारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे परिसराचा नियोजित विकास धोक्यात आला असून पर्यावरणीय संतुलनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मारणे यांनी…

Read Full News

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत; चंद्रकांत पाटील भावुक शोकसंदेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर भावुक…

Read Full News

कोथरूड शास्त्रीनगर SRA प्रकल्पातील पात्रता यादीवर प्रश्नचिन्ह; गैरव्यवहार उघड?

पुणे:कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरातील स.नं.८४/१६५ या जागेवर राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेचे नेते रोहित मारणे व मंगल सोनटक्के यांनी केला आहे. झोपडपट्टी धारकांच्या अंतिम पात्रता यादीत फेरफार करून अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे प्रामाणिक व…

Read Full News

कोथरूडमध्ये अवैध बांधकामांवर शिवसेनेचा हल्लाबोल; रोहित मारणे यांचा आंदोलनाचा इशारा?

पुणे:कोथरूड परिसरात काही बांधकाम व्यावसायिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारती उभारल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रोहित मारणे यांनी केला आहे. या प्रकरणासंदर्भात त्यांनी ठोस पुरावे गोळा केल्याचा दावा करत, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “कोथरूडमध्ये अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामे झाली असून, काही ठिकाणी खोटे दस्तऐवज वापरल्याचे स्पष्ट पुरावे आहेत….

Read Full News

समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव : भैय्याजी जोशी

डीईएस पुणे विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे भव्य उद्घाटन पुणे : शिक्षण प्रक्रियेत माहिती आणि बुद्धिमत्तेची समृद्धी दिसून येत असली तरी ज्ञानकेंद्रित दृष्टिकोनाच्या अभावामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया अवरुद्ध झाली आहे. यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पुनर्मूल्यांकन अपरिहार्य आहे, असे सखोल मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. डीईएस पुणे…

Read Full News

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: प्रोलॉगने दाखवली भव्यतेची झलक

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघ विजेतेपदासाठी लढणार; पुणेकरांच्या उत्साहाने वातावरण भारले पुणे: पुणे ग्रँड टूर २०२६ या जागतिक सायकल स्पर्धेच्या प्रोलॉग रेसने शहरात एक अनोखी ऊर्जा संचारली. आजच्या ७.५ किलोमीटरच्या टाइम ट्रायलने स्पर्धेची भव्यता आणि आंतरराष्ट्रीय दर्जा अधोरेखित होत, सह्याद्रीच्या घाटवाटांवरून ४३७ किलोमीटरचा रोमांचक प्रवास सुरू होण्याची चाहूल दिली. ३५ देशांतील २८…

Read Full News

पुणे प्रभाग २९ मध्ये संवादातून विश्वासाचा पूल; राष्ट्रवादी उमेदवारांना जनतेचा ठाम कौल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांसोबत थेट व सकारात्मक संवाद साधण्यात आला. डेक्कन जिमखाना, हॅपी कॉलनी संकुल सोसायटी, कर्वेनगर व एरंडवणे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या भावना मोकळेपणाने मांडल्या. या संवादात रस्त्यांची दुरवस्था, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, वाढती वाहतूक…

Read Full News

पुण्यातील प्रभाग २५ क मध्ये राजकीय चित्र बदलते; पेठांमधून स्वरदा बापट यांना निर्णायक जनसमर्थन

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक २५ क मध्ये राजकीय वातावरण तापले असून, शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या भागांतून उमेदवार स्वरदा गौरव बापट यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत निर्माण झालेला उत्साह हा मतदारांमधील बदलाच्या अपेक्षांचे स्पष्ट संकेत देत आहे. स्वरदा बापट यांनी प्रचारादरम्यान घराघरांत भेटी देत…

Read Full News