उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विश्वासू ‘स्वीय सहायक – मंगेश देशपांडे
“पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश” ही केवळ उक्ती राहिलेली नसून, ती आज कोथरूडसह संपूर्ण राज्यात अनुभवली जाते. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार तथा उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या कार्याचा भक्कम आधारस्तंभ म्हणून मंगेश देशपांडे यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत असलेले मंगेश देशपांडे हे कार्यकुशलता, प्रामाणिकपणा आणि अफाट कामाची क्षमता यांचा उत्तम संगम मानले जातात. दादांच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभे राहणारे, तर प्रत्येक अडचणीत सावलीसारखे साथ देणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे मंगेश देशपांडे.
नगर जिल्ह्यातील प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठित पदवी मिळवली. संघर्ष, चिकाटी आणि जिद्द यांचा वारसा घेऊन त्यांनी आपला प्रवास घडवला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे घेतलेल्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या नेतृत्वगुणांना दिशा मिळाली, आणि त्यांच्या विचारसरणीला व्यापक दृष्टिकोन प्राप्त झाला.
हीच गुणवत्ता ओळखून चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. चार्टर्ड अकाउंटंटपासून ते चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक असा त्यांचा प्रवास हा केवळ पदोन्नतीचा नाही, तर विश्वासाचा आणि कार्यक्षमतेचा प्रवास आहे.
मंगेश देशपांडे यांचे कार्य केवळ प्रशासकीय चौकटीत अडकलेले नाही. जनतेच्या अडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणसंस्थांचे विषय असोत वा कोथरूडच्या विकासाशी संबंधित कामे—प्रत्येक बाबतीत ते तळमळीने काम करताना दिसतात. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते जनतेपर्यंत पोहोचणारे सेतू बनले आहेत.
लोकसंपर्क, संवेदनशीलता आणि निस्वार्थ सेवेच्या जोरावर त्यांनी जनमानसात विश्वास निर्माण केला आहे. दादांच्या प्रत्येक पावलावर खंबीरपणे उभे राहत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही मंगेश देशपांडे अशाच निष्ठेने, कार्यतत्परतेने आणि प्रामाणिकपणे सार्वजनिक जीवनात उज्ज्वल योगदान देत राहतील, यात शंका नाही.
