पुणे :पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभा क्रमांक ११ मध्ये यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळेच दिसत आहे. अपक्ष उमेदवार सौ. अनिता तलाठी आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘कपाट’ हे केवळ चिन्ह न राहता, जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रभागातील नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे लोक पक्षाच्या नावावर नव्हे, तर कर्तृत्वावर मतदान करण्याचा निर्धार करत आहेत.
रामबाग कॉलनीपासून शिवतीर्थनगरपर्यंत नागरिकांच्या भावना एकाच सूरात व्यक्त होत आहेत— “आमचे मत कपाटालाच!” रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आणि महिला सुरक्षेसारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अनिता तलाठी यांनी प्रत्यक्ष कृतीतून उपाय दिले. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल प्रभागात आदर आणि भावनिक नातं निर्माण झाले आहे.
अनिता ताईंनी आमच्या अडचणी समजून घेतल्या,” अशी प्रतिक्रिया अनेक रहिवाशांकडून ऐकायला मिळते. शिवतीर्थनगरमधील महिलांनीही त्यांच्या सुरक्षाविषयक विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले आहे. “आज आम्ही निर्धास्त आहोत, कारण आमचा आवाज त्यांनी ऐकला,” असे एका महिलेनं भावुक होत सांगितले.
अनिता तलाठींची उमेदवारी ही केवळ निवडणूक लढत नसून, जनतेच्या विश्वासाची आणि कृतज्ञतेची कथा ठरत आहे. प्रभाग ११ मधील हा बदलाचा प्रवाह पुण्यात नव्या राजकीय संस्कृतीची नांदी ठरू शकतो, अशी भावना प्रभाग 11 मधील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
