प्रस्थापितांना अपक्षांचे कडवे आव्हान; अनिता तलाठींना वाढता जनाधार
पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारांचा जोर वाढताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना स्थानिक नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून, निवडणूक लढतीला चुरशीचे वळण मिळाले आहे. ज्येष्ठ नेते मिलिंद एकबोटे यांनी आज तलाठी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत प्रभागातील विविध भागांत भेटी…
