जनतेच्या विश्वासातून उभा राहत आहे ‘अपक्ष आवाज’ — कोथरूड प्रभाग ११ मध्ये अनिता तलाठींच्या लढ्याला भावनिक बळ
पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये एक वेगळाच सूर उमटताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ आता केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विश्वास आणि अपेक्षांचा भावनिक प्रवाह बनत आहे. समाजसेविका आणि उद्योजिका म्हणून ओळख असलेल्या तलाठी यांनी निवडणूक रिंगणात…
