शिक्षकांचा वाढता पाठिंबा; कौस्तुभ गावडे यांचा विजयाचा विश्वास
पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण भागांतून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने करण्यात येत आहे. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार गावडे…
