पुणे :कोरोना महामारीने संपूर्ण जग ठप्प केले असताना माणुसकीची खरी कसोटी सुरू झाली होती. भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या त्या काळात पुण्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सौ. अनिता तलाठी यांनी केलेली निस्वार्थ सेवा आजही नागरिकांच्या मनात जिवंत आहे. संकटाच्या छायेत सापडलेल्या सामान्य माणसांसाठी त्या खऱ्या अर्थाने आधारवड ठरल्या.
२०२० मध्ये कोविड-१९ची साथ सुरू होताच लॉकडाउनमुळे अन्न, औषधे आणि वैद्यकीय मदत मिळवणे अनेकांसाठी आव्हान बनले. अशा परिस्थितीत घरात बसून पाहत राहण्याऐवजी सौ. तलाठी स्वतः रस्त्यावर उतरल्या. झोपडपट्ट्या, वृद्धाश्रम, मध्यमवर्गीय वसाहती पिंजून काढत त्यांनी नागरिकांच्या गरजा प्रत्यक्ष समजून घेतल्या.
गरजूंसाठी अन्नपॅकेट्सचे वाटप, अत्यावश्यक औषधांची व्यवस्था, डॉक्टरांशी समन्वय, मास्क व सॅनिटायझरचे वितरण अशी कामे त्यांनी सातत्याने केली. वयोवृद्ध, आजारी आणि एकाकी नागरिकांसाठी त्या धावून गेल्या. रेशनकार्ड, वैद्यकीय विमा व सरकारी आपत्कालीन योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.“संकटात माणूस म्हणून उभे राहणे हीच खरी सेवा,” हा विचार त्यांच्या प्रत्येक कृतीतून उमटत राहिला.
या सेवाभावी कार्यामुळे प्रभागातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला. नागरिकांनी त्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरवले. आजही त्या समाजकार्यात सक्रिय आहेत.
येणाऱ्या १५ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचे निवडणूक चिन्ह *कपाट*आहे. अधिकाधिक मतांनी निवडून देऊन समाजसेवेची ताकद द्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
