पुणे:कोथरूडमधील रामबाग कॉलनी व शिवतीर्थनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, ‘कपाट’ या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या सौ.अनिता विवेक तलाठी यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरांतून, गल्लोगल्ली फिरताना “आमचे मत तुम्हालाच” असा थेट आणि भावनिक विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक प्रश्नांची जाण, सातत्यपूर्ण संपर्क आणि कोणतेही पद नसतानाही केलेली समाजोपयोगी कामे यामुळे तलाठी यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व ड्रेनेज समस्या, महिलांची सुरक्षितता आणि अंतर्गत भागातील सुविधांचा अभाव या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला.
त्याचबरोबर स्वच्छता, सुरक्षा जनजागृती, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा या कामांमुळे त्या ‘काम करणाऱ्या’ नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत.
प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना तलाठी म्हणाल्या, “ही निवडणूक व्यक्तीची नाही, तर प्रभागाच्या भविष्याची आहे. शब्दांपेक्षा कामातून विश्वास जिंकणे, हेच माझे धोरण आहे.” महिलांचे नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि संवेदनशील प्रशासन ही त्यांची प्रमुख आश्वासने आहेत.
कोथरूडकरांचा वाढता पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, प्रभाग ११ (ब) मध्ये ‘कपाट’ चिन्हावर जनविश्वासाची मोहोर बसत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.
