Headlines

पुण्याच्या प्रभाग ३७ मध्ये जनविश्वासाचा कौल;शिवसेनेचा बाईक रॅलीतून शक्तीप्रदर्शन

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३७ मध्ये शिवसेनेने आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली भव्य बाईक रॅली म्हणजे जनविश्वासाचा उत्स्फूर्त कौल ठरला. सावंत विहार येथून सुरू झालेली रॅली सरहद चौक, भारती विद्यापीठ व त्रिमूर्ती चौक मार्गे पुढे जात असताना प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी…

Read More

प्रस्थापितांना अपक्षांचे कडवे आव्हान; अनिता तलाठींना वाढता जनाधार

पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारांचा जोर वाढताना  दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी  यांना स्थानिक नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून, निवडणूक लढतीला चुरशीचे वळण मिळाले आहे. ज्येष्ठ नेते मिलिंद एकबोटे यांनी आज तलाठी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत प्रभागातील विविध भागांत भेटी…

Read More

अमोल बालवडकर यांची राष्ट्रवादीत औपचारिक प्रवेश; महानगरपालिका उमेदवारी जाहीर, जल्लोषात अभिनंदन

 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर यांनी पक्षात औपचारिक प्रवेश केला. या प्रसंगी उपस्थित सहकारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पक्षाच्या वतीने बालवडकर यांची मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्वांनी मनापासून अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. हा क्षण बालवडकर यांच्यासाठी अत्यंत भावनिक तसेच…

Read More

उंद्रीत महिला उद्योजकांचा उत्साह; ‘राईज अँड शाइन’कडून फ्ली मार्केटला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून महिलांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि विस्तार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. संस्थापक सौ. सुप्रिया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. टीममधील मनीषा भुजबळ आणि अनीता मॅगिलाम्पू यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विविध आकर्षक स्टॉल्समधून…

Read More

कोथरूडमध्ये अवैध ओढा बांधकाम: महापौरांकडून ४८ तासांत कारवाईचे आश्वासन

पुणे: अवकाळी पावसामुळे कर्वे रोड परिसरात झालेल्या जलसंचयामुळे कोथरूडमधील डीपी रोडवरील ओढ्यावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे पुणे महानगरपालिकेचे लक्ष वेधले गेले आहे. प्रभाग ३१ मधील या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते रोहित मारणे यांनी स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे भेलके यांच्यासोबत महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांना निवेदन देऊन…

Read More

जय शंकर टेंडरवर प्रश्नचिन्ह?; कर्मचाऱ्यांना कमी वेतन व उशिरा देयकांचा आरोप

पुणे: पुणे महानगरपालिका (पीएमसी) अंतर्गत देण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या कंत्राटात ‘जय शंकर टेंडर’ कंपनीबाबत अनियमिततेच्या चर्चांना उधाण आले आहे. संबंधित कंत्राटात उच्चपदस्थ अधिकारी किंवा प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची चर्चा रंगू लागली असून, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनातील तफावत आणि देयकांच्या विलंबामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारच्या प्रचलित नियमांनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुमारे ३० हजार…

Read More

बावधनमध्ये खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दुरुस्तीची कामे

पुणे : परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवास करता यावा, यासाठी विविध ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्याची कामे करण्यात आली आहेत. बावधन बुद्रुक, ओंकार गार्डन चौक, उत्तमनगर, भुंडे वस्ती, बकाजी कॉर्नर यासह परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना…

Read More

४० वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर उल्का मोकासदार यांचे राजकीय पुनर्वसन होणार?

पुणे : राष्ट्र सेविका समिती दलाच्या सेविका म्हणून गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उल्का मोकासदार यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. कोथरूडच्या रहिवासी असलेल्या आणि अभ्यासू,उत्तम वक्त्या,वस्ती पातळी पासून उद्योजक,शैक्षणिक संस्था अशा अनेक संस्था,व्यक्ती यांच्या संपर्कात असलेल्या मोकासदार या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिल्या असून, आगामी काळात पक्ष संघटनेकडून त्यांना…

Read More

समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव : भैय्याजी जोशी

डीईएस पुणे विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे भव्य उद्घाटन पुणे : शिक्षण प्रक्रियेत माहिती आणि बुद्धिमत्तेची समृद्धी दिसून येत असली तरी ज्ञानकेंद्रित दृष्टिकोनाच्या अभावामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया अवरुद्ध झाली आहे. यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पुनर्मूल्यांकन अपरिहार्य आहे, असे सखोल मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. डीईएस पुणे…

Read More

लोकमान्य पुनर्विकासाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल एमएचएडीएला धरले धारेवर; म्हाडाच्या मनमानी कारभारावर खडे बोल पुणे:पुण्यातील सदाशिव पेठेतील लोकमान्य नगर येथील पुनर्विकास प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रकल्पाला मंजुरी दिली असून, राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएचएडीए) यांना कडाडून फटकारले आहे. न्यायालयाने एमएचएडीएची भूमिका मनमानी, तथ्यहीन आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे ठामपणे नमूद केले….

Read More