कसबा मतदारसंघात भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण; कुणाल टिळक यांचा विजय निश्चित करण्याचे आवाहन

👁️ 888 Views

पुणे: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. हेमंत रसाने यांच्या उपस्थितीत आयोजित मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटन बळकटी, प्रभागातील स्थानिक समस्या आणि विकासाच्या दिशा यावर सखोल चर्चा झाली. भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल टिळक यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

मेळाव्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील विविध समस्या मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबतच्या अपेक्षा यावर जोरदार भाष्य करण्यात आले. तसेच, निवडणूक तयारीबाबत प्रत्येक कार्यकर्त्याच्या भूमिकेविषयी विचारविमर्ष झाला. कार्यकर्त्यांनी सांगितले, की प्रभागातील नागरिकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पक्षाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी. यावेळी उमेदवार कुणाल टिळक यांनी प्रभागातील विकास योजनांचा आढावा घेतला आणि पक्षाच्या ध्येयांशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी अधोरेखित केली.

कुणाल टिळक म्हणाले म्हणाले,एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले ते पुढे म्हणाले,”निवडणूक ही केवळ मत मिळवण्याची स्पर्धा नसून, नागरिकांच्या सेवेची संधी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची आहे. एकत्र येऊन प्रभागाचा विकास करूया.” त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय धोरणांचा उल्लेख करत, स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी कशी होईल याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. मेळाव्यातील सकारात्मक वातावरणाने कार्यकर्ते उत्साही झाले असून, आता घराघरापर्यंत पक्षाचे संदेश पोहोचवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

या मेळाव्यामुळे प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप संघटना अधिक बळकट झाली असल्याचे मत कार्यकर्त्यांमध्ये व्याप्त आहे. पक्षाच्या निवडणूक मोहिमेला या उपक्रमाने निश्चितच चालना मिळाली आहे.