पुणे मनपा निवडणूक २०२५-२६ : प्रभाग ७ डमध्ये मनसेच्या विनायक कोतकरांचा विकासकेंद्रित प्रचार

👁️ 777 Views

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ड (गोखलेनगर–वाकडेवाडी) येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विनायक बाळकृष्ण कोतकर यांनी विकासकेंद्रित अजेंड्यासह प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. ‘धनशक्तीविरुद्ध जनशक्ती’ असा स्पष्ट संदेश देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

“माझा प्रभाग… माझे कुटुंब” ही भूमिका मांडत कोतकर म्हणाले की, ही निवडणूक जात, धर्म किंवा व्यक्तिकेंद्री राजकारणासाठी नसून स्थानिक विकासासाठी आहे. रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, महिलांचे सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि युवकांची बेरोजगारी हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत.

युवा कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले कोतकर गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत, रामोशी वाडी, निलज्योती सोसायटी आणि वैदूवाडी परिसरात सातत्याने संपर्कात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्भीड विचारांचे आणि अमित ठाकरे यांच्या युवा नेतृत्वाचे ते प्रतिनिधी मानले जातात. “मी केवळ कार्यालयात बसणारा नव्हे, तर प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लोकप्रतिनिधी असेन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मागील काळात कचरा व्यवस्थापनासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला, तर महिलांसाठी घेतलेल्या शिबिरांमुळे स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

मतदान गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, रेल्वे इंजिन हे मनसेचे निवडणूक चिन्ह आहे. प्रभागातील सुमारे २५ हजार मतदारांचा कौल या लढतीचे भवितव्य ठरवणार आहे.