बावधनमध्ये खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दुरुस्तीची कामे

👁️ 326 Views

पुणे : परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवास करता यावा, यासाठी विविध ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्याची कामे करण्यात आली आहेत. बावधन बुद्रुक, ओंकार गार्डन चौक, उत्तमनगर, भुंडे वस्ती, बकाजी कॉर्नर यासह परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली.

पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी संबंधित ठिकाणांची पाहणी करून प्राधान्याने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे बुजविणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची सुधारणा करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी परिसरातील रस्त्यांची पाहणी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे किरण दगडे पाटील, नगरसेवक, पुणे महानगरपालिका यांनी सांगितले.