सेवेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब; प्रभाग ११ मध्ये ‘कपाट’कडे झुकलेले जनमत

👁️ 814 Views

पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील रामबाग कॉलनी व शिवतीर्थनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून ‘कपाट’ या निवडणूक चिन्हावर लढणाऱ्या सौ. अनिता विवेक तलाठी यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद मिळत आहे. गल्लीबोळांतून, घराघरांतून फिरताना “आमचे मत तुम्हालाच आमचं मत कपाटालाच” अशी थेट भावना नागरिक व्यक्त करत असून, जनविश्वासाची मोहोर त्यांच्यावर उमटताना दिसत आहे.

समाजसेविका व उद्योजिका म्हणून परिचित असलेल्या अनिता तलाठी यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. नागरिकांच्या मागणीनुसार विविध विकासकामांसाठी खासदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचे सकारात्मक परिणाम आज प्रभागात दिसून येत आहेत.

ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण वर्गाकडूनही त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे. “तुमच्या कामांची ही पोचपावती आहे,” अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिक आपली भावना व्यक्त करत आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांशी आपुलकीचा संवाद साधत, प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगत आहेत.

सातत्यपूर्ण जनसंपर्क, कामाचा ठसा आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळे अनिता तलाठींची उमेदवारी अधिक बळकट झाली असून, हा उत्साह आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल, अशी भावना प्रभागात व्यक्त होत आहे.