पुण्याच्या प्रभाग ३७ मध्ये जनविश्वासाचा कौल;शिवसेनेचा बाईक रॅलीतून शक्तीप्रदर्शन

👁️ 296 Views

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३७ मध्ये शिवसेनेने आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली भव्य बाईक रॅली म्हणजे जनविश्वासाचा उत्स्फूर्त कौल ठरला.

सावंत विहार येथून सुरू झालेली रॅली सरहद चौक, भारती विद्यापीठ व त्रिमूर्ती चौक मार्गे पुढे जात असताना प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. भगवे झेंडे, दुचाकींची लांबलचक रांग आणि “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी संपूर्ण प्रभाग भारावून गेला. विशेषतः तरुणाईचा मोठा सहभाग ही रॅलीची जमेची बाजू ठरली.

राज्यात सुरू असलेल्या विकासाभिमुख वाटचालीवर विश्वास व्यक्त करत मनसेचे पुणे शहर संघटक व खडकवासला विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत गोगावले तसेच भाजपचे खडकवासला पूर्वमंडल चिटणीस श्रीकांत पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री व आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवेश अधिक अर्थपूर्ण ठरला.

यावेळी शिंदे म्हणाले, “ही गर्दी केवळ उत्साहाची नाही, तर विकासाला मिळालेली साथ आहे. काम करणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रभाग ३७ चा चेहरामोहरा बदलणार आहोत.”

प्रभागातील शिवसेनेचे उमेदवार – सागर बारणे, सुलक्ष्मी धनकवडे, मोहिनी देवकर व गिरीराज सावंत – यांना धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.

प्रभाग ३७ मध्ये विकासाच्या राजकारणाची नवी सुरुवात झाल्याचे चित्र या रॅलीतून स्पष्ट झाले.