४० वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर उल्का मोकासदार यांचे राजकीय पुनर्वसन होणार?

👁️ 885 Views

पुणे : राष्ट्र सेविका समिती दलाच्या सेविका म्हणून गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उल्का मोकासदार यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. कोथरूडच्या रहिवासी असलेल्या आणि अभ्यासू,उत्तम वक्त्या,वस्ती पातळी पासून उद्योजक,शैक्षणिक संस्था अशा अनेक संस्था,व्यक्ती यांच्या संपर्कात असलेल्या मोकासदार या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिल्या असून, आगामी काळात पक्ष संघटनेकडून त्यांना कोणती जबाबदारी किंवा राजकीय संधी दिली जाणार का, याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसंपर्क आणि संघटनात्मक काम करणाऱ्या मोकासदार यांना राजकीय पातळीवर अपेक्षित संधी मिळाली नसल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध स्तरांवर काम करत असतानाही त्यांना सातत्याने राजकीय संधीपासून दूर ठेवण्यात आल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय असलेल्या मोकासदार यांना पक्षाकडून आगामी काळात योग्य जबाबदारी मिळणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या दीर्घ सामाजिक कार्याचा आणि संघटनात्मक अनुभवाचा विचार करून पक्ष नेतृत्व त्यांना नव्या भूमिकेत संधी देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, “दीर्घकाळ पक्षाशी आणि सामाजिक कार्याशी जोडलेल्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी योग्य जबाबदारी मिळणे आवश्यक आहे,” अशी भूमिका काही भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, मोकासदार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत पक्ष नेतृत्वाकडून अधिकृत निर्णय किंवा घोषणा अद्याप झालेली नसल्यास, या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळातील अंदाज आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा म्हणूनच पाहावे लागेल.

भारतीय जनता पक्ष महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण देण्यासाठी आग्रही असताना,स्वबळावर कार्य करणाऱ्या या कार्यकर्तीला का डावलत आहे,अशी कुजबुज खाजगीत कार्यकर्ते करत आहेत.

आता आगामी काळात पक्ष संघटना आणि नेतृत्वाकडून उल्का मोकासदार यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना कोणती जबाबदारी दिली जाते का, याकडे कोथरूडसह स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.